मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वात बोल्ड गाणे रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला धमाल कॉमेडी, बोल्ड दृश्य व डबल मिनिंग संवादाचा भरणा असलेला ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट येणार आहे. प्रथमेश परब मिलिंद कवडे दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. प्रथमेशसोबत रितिका श्रोत्रीचीही भूमिका आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेता अभिजीत आमकर-प्रणाली भालेराव ही जोडीदेखील पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटातील एक गाणे रिलीज करण्यात आले असून मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वांत बोल्ड गाणे असल्याचे म्हटले जात आहे.

श्रुती राणेने ‘ये चंद्राला’ हे गाणे गायले असून ते जय अत्रेंनी शब्दबद्ध केले आहे. अभिजीत आमकर व प्रणाली भालेराव या गाण्यात रोमान्स करताना पाहायला मिळत आहेत.

अडल्ट कॉमेडी, हॉट सीन्स, किसिंग सीन्स चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहेत. या गाण्यातही ट्रेलरमधील बोल्डपणा पाहायला मिळतो. अजय ठाकूर, ओम प्रकाश भट, सुजय शंकरवार, रवी बहरी, इंदरजित सिंग, धनंजय मासूम आणि रबिंद्र चौबे यांनी पर्पल बुल एन्टरटेनमेंट प्रस्तुत टकाटक ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर, उमेश बोलके आदी कलाकारही आहेत. हा चित्रपट येत्या 28 जूनला सर्वत्र प्रदर्शित होईल.

Leave a Comment