दुसरे लग्न केल्यानंतर आईला मुलाचे भावनिक पत्र, नेटकरीही भावूक


कोल्लम : मुलाने आईच्या दुसऱ्या लग्नानंतर तिला एक भावनिक पत्र लिहिले आणि सोशल मीडियावर हे पत्र पोस्ट केल्यानंतर नेटकरीही त्याचे पत्र वाचून भावूक झाले. आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नानंतर गोकुळ श्रीधर याने लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात त्याने म्हटले आहे, आई, सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा. मुलाच्या भावनिक पत्राला आतापर्यंत ३२,००० पेक्षा जास्त लाईक असून ४००० लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

पहिल्या पतीकडून गोकुळ याच्या आईला घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागले होते. ती सातत्याने मार खात होती. आई हे सर्व फक्त आपल्यासाठी सहन करत असल्याची खंत नेहमी गोकुळ याला वाटत होती. तो आपल्या मनावर एक ओझे घेऊन नेहमी जगत होता. पण जेव्हा त्याच्या आईने आता नव्या आयुष्याला सुरुवात केली, गोकुळ याने तेव्हा आपण आनंदी असून, यापेक्षा दुसरी सुखावणारी कोणतीच गोष्ट नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्या आईला त्याने शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नानंतर केरळ राज्यातील कोल्लम येथील गोकुळ श्रीधर याने लिहिलेली फेसबुक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. अनेकजणांनी ही पोस्ट वाचून त्याचे कौतुक केले आहे. आपल्या आईला मल्याळम भाषेत असणाऱ्या या ह्रदयस्पर्शी पोस्टमध्ये गोकुळ याने दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण ही पोस्ट करावी की करु नये, असा मनात कल्लोल झाला होता. त्यामुळे त्याने ती पोस्ट केली. गोकुळ याच्या फेसबूक पोस्टमधून त्यांच्या आईने आयुष्यात खूप हालअपेष्टा सहन केल्या आहेत, हे स्पष्ट होत आहे.

माझ्यासाठी ज्या महिलेने तिने आपला आनंद आणि तिचे सारे सुख बाजूला ठेवले. पहिल्या पतीकडून तिने अनेक यातना सहन केल्या आहेत. तिला जेव्हा मारहाण व्हायची, डोक्यातून रक्त वाहायचे तेव्हा अनेकदा तू हे का सहन करत आहेस, हे मी तिला विचारायचो. अनेकदा यावेळी मी हे सगळे तुझ्या भल्यासाठी सहन करत असल्याचे ती सांगायची. हे मला स्पष्ट आठवतो आहे. तो दिवस मी जेव्हा तिच्यासोबत घर सोडले तेव्हा मी या सर्व क्षणांचा विचार केला. माझ्यासाठी जिने सर्व तरुणपण घालवले, त्या माझ्या आईची अनेक स्वप्ने आहेत. अजून खूप मोठी उंची तिला गाठायची आहे. मला अजून काही बोलायचे नाही. ही अशी एक गोष्ट आहे जी लपवता कामा नये, असे मला सारखे वाटत होते. आई. सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा.

Leave a Comment