#MeToo प्रकरणात मुंबई पोलिसांकडून नाना पाटेकर यांना क्लीन चिट


मुंबई – मुंबई पोलिसांनी अभिनेते नाना पाटेकर यांना तुनश्री दत्ताच्या लैंगिक शोषण प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे लैगिक शोषण केल्याचा सकृतदर्शनी एकही पुरावा न मिळाल्याने अंधेरी न्यायालयात सादर केलेल्या बी समरी रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांनी नानाला निर्दोष ठरवले आहे.

अभिनेता नाना पाटेकर यांनी हॉर्न ओके प्लिज या सिनेमाच्या सेटवर आयटम सॉंगच्या शुटिंग दरम्यान आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका खाजगी वाहिनीशी बोलताना तनुश्री दत्ताने केला होता. #MeToo अभियान परदेशात जरी यशस्वी झाले असले तरीही ते भारतात शक्य नसल्याचे म्हणत 2008 साली घडलेल्या या प्रसंगाबाबत तिने पुन्हा एकदा मौन सोडले. त्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि दिग्दर्शक सोशल मीडियावर यांच्याविरोधात मीटू मोहीम सुरू झाली.

तनुश्रीने या मोहिमेचा वणवा पेटल्यानंतर नाना पाटेकर यांच्या विरोधात अंधेरीतील ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. मग पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली. या प्रकरणी अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले. मात्र यातील एकानेही नानाने तनुश्रीसोबत नक्की कोणते असभ्य वर्तन केले ते पोलिसांना न सांगू शकल्यामुळेच चौकशीअंती आरोपात तथ्य आढळले नसल्याने तसे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या बी समरी रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment