टायगरसोबत ‘बागी 3’मध्ये झळकणार रितेश देशमुख


सध्या नवीन कलाकारांची एन्ट्री साजिद नाडियाडवाला निर्मित ‘बागी 3’ या चित्रपटात होत आहे. त्यात हाती आलेल्या बातमीनुसार, आता अभिनेता रितेश देशमुखची देखील ‘बागी 3’ मध्ये वर्णी लागली आहे. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अहमद खान यांनी काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती.


प्रेक्षकांचा ‘बागी 1’ आणि ‘बागी 2’ ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सर्वत्र ‘बागी 3’ या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटामध्ये आता रितेश देशमुखची वर्णी लागली आहे. ह्या चित्रपटाबद्दल चित्रपट ट्रेड समीक्षक तरन आदर्श यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘बागी 3’ चित्रपटात रितेश देशमुखची वर्णी लागली आहे.

Leave a Comment