अखेर रिलीज झाला ‘साहो’चा बहुप्रतीक्षित टीझर


बाहुबली अर्थात प्रभासच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता खूपच ताणली गेली होती. प्रभास सध्या काय करतो आहे, अशी चर्चा बराच काळ होती. या चित्रपटात भरपूर अॅक्शन आणि थ्रिल असेल याची ग्वाही बातम्यांमधून मिळत होती. अखेर नुकताच रिलीज झालेल्या टीझरने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

अभिनेता प्रभासचा या चित्रपटातील लूक जबरदस्त आहे. त्याची अॅक्शन, चपळता आणि अभिनय नक्कीच डोळ्याची पारणे फेडणारी आहेत हे टीझर पाहून निश्चित वाटते. ‘बागी’ चित्रपटात भरपूर स्टंट केलेल्या अभिनेत्री श्रध्दा कपूरची भन्नाट अॅक्शन यात पाहायला मिळते. यात नील नितिन मुकेश, अरुण विजय आणि जॅकी श्रॉफ सारख्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. ‘साहो’ चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा हा टीझर आहे. ‘साहो’ येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

Leave a Comment