सलग चौथ्यांदा लंडन न्यायालयाने फेटाळली नीरव मोदीची जामीन याचिका


नवी दिल्ली – आज सलग चौथ्यांदा लंडनच्या वेन्समिन्स्टर न्यायालयाने नीरव मोदी याची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. मोदी याने याआधी ३ वेळेस याचिका दाखल केली होती. १९ मार्च रोजी नीरव मोदीला अटक करण्यात आली होती.

मंगळवारी मोदीच्या याचिकेवरील इंग्लंडचे उच्च न्यायालय ‘रॉयल कोर्टस ऑफ जस्टिस’मध्ये पूर्ण सुनावणी झाली आहे. वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात मोदीच्या वकिलांनी सलग तीन वेळा जामीन नाकारला होता. मोदीने त्याविरोधात न्यायलयात दाद मागणारी याचिका दाखल केली होती. आज त्यावर सुनावणी झाली. मोदीचे वकील बॅ. क्लेयर मोंटगोमरी म्हणाले, भारत सरकारने दावा केलेल्या गुन्ह्यातील ते आरोपी नाहीत. नीरव मोदी हे खूप वर्षांपासून हिरे डिझाईनर आहेत. प्रामाणिक आणि विश्वासू त्यांना मानले जाते, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. पण न्यायालयावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. शिवाय ही याचिका फेटाळून लावली. त्याच बरोबर वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयातच मोदीला अटक करण्याचा निर्यम कायम ठेवला.

Leave a Comment