या पत्नीने नवऱ्याला उकाड्यापासून थंडावा मिळावा म्हणून तळली नवरत्न तेलात भजी


नवी दिल्ली – आपल्या नवऱ्याला जाणवणाऱ्या उकाड्यापासून थंडावा मिळावा म्हणून बायकोने चक्क नवरत्न तेलामध्ये भजी तळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. तर नेटकऱ्यांचा टिकटॉकवरील या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद मिळाला असून हा व्हिडीओ पाहताना कोणालाही हसू आवरता येत नाही आहे अशी स्थिती निर्माण झाली आाहे.

पावसाच्या सरी सध्या राज्यात तितक्याश्या जाणवत नसून ऐन दुपारच्या वेळेस उकाडाच जाणवत असल्यामुळे उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात पिताना दिसून येतात. पण टिकटॉकवर चक्क बायकोने नवरत्न तेलात नवऱ्यासाठी भजी तळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. खरंतर डोक्याला शांतता मिळावी म्हणून नवरत्न तेल हे वापरले जाते. पण टिकटॉक वरील व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे लोक काहीही करु शकतात हे आता पाहायला मिळले आहे.

Leave a Comment