भारतीय क्रिकेटप्रेमींवर सर्फराज अहमदची टीका


पुन्हा एकदा विश्वचषकाच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या आमने-सामने येतील. हा रविवारी, 16 जूनला मॅन्चेस्टर क्रिकेट मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाईल. पण पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदने या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटप्रेमींवर निशाणा साधला आहे. जेव्हा सर्फराजला विचारण्यात आले की, पाकिस्तानी चाहते जर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला हूटिंग करू लागले तर तु विराट कोहलीसारखे करशील का? सर्फराजने ह्यावर म्हणाला, मला नाही वाटत पाकिस्तानी चाहते असे काही करतील. क्रिकेटवर आणि खेळाडूंवर ते प्रेम करतात.

भारतीय प्रेक्षकांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान स्मिथला चीटर चीटर म्हणून चिडवायला सुरूवात केली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने असे करताच प्रेक्षकांना थांबवले आणि असे म्हणू नका सांगताना कोहलीने चाहत्यांच्यावतीने स्मिथची माफीही मागितली.

Leave a Comment