‘आर्टिकल १५’मधील रॅप गाण्याचा टीझर रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आयुष्मान खुरानाचा ‘आर्टिकल १५’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा भेटीला आला. हा चित्रपट समाजातील गंभीर अशा विषयावर आधारित असून आयुष्मान या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात येणार आहे. नुकताच या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

आयुष्मानचे हे गाणे एक अँग्री रॅप असणार आहे. या रॅपचे ‘शुरू करें क्या’, असे बोल आहेत. समाजात बदल घडवण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे, अशा आशयाचे हे रॅप आहे. आयुष्मानच्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाची टीम त्यासाठी सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा टीझर आयुष्माननेही शेअर केला आहे. त्याने याला बदल घडवायचा असेल, तर काम सुरू करायचे का?, असे कॅप्शन दिले आहे. हे गाणे १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment