एका हॉररपटाच्या निर्मितीसाठी सज्ज झाला करण जोहर


त्रिकुट प्रेमकहाण्यांसाठी प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा डॅडी अर्थात करण जोहर आता तुमच्या भेटीला एक हॉररपट घेऊन येणार आहे. आजवर त्याच्या ‘धर्मा प्रोडक्शन’अंतर्गत बऱ्याच सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. पण आता तो लवकरच एक हॉरर चित्रपट तयार करणार आहे. त्याने सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा केली आहे.


इन्स्टाग्रामवर करण जोहरने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये या हॉररपटाची घोषणा केली आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. पण, त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. तो याबाबत आणखी माहिती लवकरच शेअर करणार असल्याचे त्याने लिहिले आहे. करण जोहरच्या या घोषणेनंतर लगेचच त्याच्या या आगामी चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे.

यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांच्या नावाची या चित्रपटासाठी चर्चा सुरू आहे. पण, याबाबत विकी किंवा भूमीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक शंशाक खेतानसोबत एक हॉरर चित्रपट साकारणार असल्याचे एका पोस्टद्वारे विकीने सांगितले होते. तसेच करण जोहरनेही त्याच्या या पोस्टमध्ये शशांक खेतानला टॅग केल्यामुळे ते एकत्र येऊन या चित्रपटाची निर्मिती करणार का, असा अंदाज लावला जात आहे.

Leave a Comment