भारतीय रेल्वेची नवीन सेवा, आता धावत्या ट्रेनमध्ये घ्या मसाजचा आनंद


नवी दिल्ली- भारतीय रेल्वेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे की प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये मसाज सेवा उपलब्ध असेल. शनिवारी एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की सध्या मसाजची सुविधा इंदोर येथून चालणाऱ्या 39 गाड्यांमध्ये उपलब्ध असेल. अधिकारी म्हणाले की हा प्रस्ताव पश्चिम रेल्वे विभागाच्या रतलाम डिव्हिजनने ठेवला होता.

अधिकारी म्हणाले, “भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिल्यांदा प्रवाशांच्या सोयीसाठी धावत्या ट्रेनमध्ये मसाज सेवा पुरविली जाईल. यामुळे महसूल वाढलेच पण पर्यटकांची संख्याही वाढेल. रेल्वेला 20 लाख रुपये अतिरिक्त वार्षिक महसूल मिळणार आहे आणि असा अंदाज आहे की तिकिट विक्रीसाठी 20,000 सेवा प्रदात्यांकडे 90 लाख रुपयांच्या तिकिटाची अतिरिक्त विक्री होईल.

रेल्वे बोर्डचे मीडिया व कम्युनिकेशन्सचे संचालक राजेश वाजपेई म्हणाले, असे पहिल्यांदाच झाले आहे कि अशा प्रकारचा करार करण्यात आला आहे. दरम्यान पाय आणि डोके मसाजसाठी किंमत 100 रुपये मोजावे लागतील. ही योजना रेल्वेच्या योजनेचा एक भाग आहे ज्यामध्ये सर्व क्षेत्र आणि विभागांना नवीन आणि नाविन्यपूर्ण कल्पना देण्यास सांगितले होते जेणेकरून इतर गोष्टींच्या माध्यमातून महसूलात वाढ होऊ शकेल.

Leave a Comment