धनुषच्या ‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी फकिर’चा ट्रेलर रिलीज


आजवर वेगवेगळे प्रयोग असलेल्या अनेक चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांचे प्रेमही मिळाले आहे. आता अशाचप्रकारची वेगळी भूमिका त्याच्या आगामी ‘द एक्स्ट्राऑर्डिनरी फकिर’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तो यामध्ये जादुगाराच्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

धनुषचा ‘द एक्स्ट्राऑर्डिनरी फकिर’ हा पहिला वहिला आतंरराष्ट्रीय चित्रपट आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात आतंरराष्ट्रीय कलाकार झळकणार आहे. एका जादुगारावर आधारित हा चित्रपट आहे. तो त्याच्या जादुच्या विविध प्रयोगासाठी कशाप्रकारे देशविदेशात प्रवास करतो याचा रंजक प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

भारतासह अमेरिका, कॅनडा, लंडन, सिंगापूर, मलेशिया, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाची फ्रेन्च-इंग्रजी, अशी भाषा आहे. त्याचबरोबर हा चित्रपट तमिळ, तेलुगू भाषांमध्येही रिलीज करण्यात येणार आहे.

हॉलिवूड दिग्दर्शक केन स्कॉट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘द एक्स्ट्राऑर्डिनरी फकिर’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. मुंबईच्या रस्त्यावर जादुचे प्रयोग दाखवणारा ‘अजा’ (धनुष) आईच्या मृत्यूनंतर वडिलांना शोधण्यासाठी पॅरिसला पोहोचतो. तिथे त्याच्या आयुष्यात कशाप्रकारे चढउतार येतात याची गोष्ट या चित्रपटात दाखवली जाणार आहे. हा चित्रपट २१ जूनला रिलीज होणार आहे.

Leave a Comment