बँकॉकच्या रस्त्यांवर अक्षयची ‘सूर्यवंशी’साठी स्टंटबाजी


दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. तो रोहितच्या सुर्यवंशी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रोहित आणि रणवीरच्या सिम्बामध्ये अक्षयच्या सूर्यवंशीची झलक दाखवण्यात आली होती.

सध्या अक्षय या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बँकॉकला गेला आहे. सोशल मीडियावर येथील शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. अॅक्शन चित्रपटांसाठी रोहित शेट्टी हा ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या चित्रपटात थरारक स्टंट, अॅक्शन आणि भरपूर गाड्या पाहायला मिळतात. या फोटोतही अक्षय कुमार बाईकवरून स्टंट साकारताना दिसत आहे. तो बँकॉकच्या रस्त्यावरून वेगवेळ्या गाड्यांमधून बाईक चालवताना दिसत आहे.

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कतरिना कैफदेखील झळकणार आहे. या चित्रपटात अक्षय पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. अलिकडेच अक्षयने ‘केसरी’ चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही चागला प्रतिसाद मिळाला.

Leave a Comment