मायावतींनी पंक्चर केली समाजवादीची सायकल - Majha Paper

मायावतींनी पंक्चर केली समाजवादीची सायकल


नवीदिल्ली – समाजवादी पक्षासोबत असलेली युती बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी तोडली आहे. यापुढे पुढील निवडणुका बसप स्वबळावर लढवणार, अशी माहिती मायावतींनी पत्रकारपरिषदेत दिली.

आगामी काळात जर आम्हाला एकत्र येण्याची गरज भासली तर पुन्हा आम्ही युती करू शकतो. युतीमुळे जर यश मिळत नसेल आताच वेगळे होणे हे दोन्ही पक्षांसाठी चांगले आहे. उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुका बसप स्वबळावर लढणार, अशी माहिती युती तोडताना मायावतींनी दिली.

Leave a Comment