ऋतिकच्या ‘सुपर ३०’चा ट्रेलर रिलीज


अनेक अडथळ्यांनंतर जुलैमध्ये ऋतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला ‘सुपर ३०’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या रिलीज डेट विषयीची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे.

हा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आनंद कुमार या गणित तज्ज्ञाची भूमिका ऋतिक रोशन साकारणार आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटातून आनंद कुमार आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात येणार आहे.


चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाचे एक नवे पोस्टर शेअर करत काल ट्रेलरच्या रिलीज बद्दलची माहिती दिली होती. विकास बहल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून विकास यांच्यावर मीटू प्रकरणी आरोप झाल्यानंतर चित्रपटाच्या क्रेडीटमधून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. पण याप्रकरणी विकास बहलला आता क्लीन चीट मिळाली असून पुन्हा एकदा त्यांना चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे श्रेय देण्यात आले आहे.

Leave a Comment