
सुरुवातीपासूनच अनेक कारणांमुळे सलमान खानची मुख्य भूमिका असलेला ‘भारत’ चित्रपट चर्चेत राहिला. त्यानंतर आता 5 जूनला प्रदर्शित होणाऱ्या चित्रटाच्या शीर्षकाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
सलमानच्या भारतच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
आता दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटाविरोधातील ही याचिका फेटाळली आहे. भावना ‘भारत’ या चित्रपटाच्या शीर्षकामुळे दुखावत असल्याचा दावा करत एका व्यक्तीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘भारत’ शब्दाचा वापर बोधचिन्हे व नावे (अनुचित वापर प्रतिबंधक) कायद्यानुसार व्यावसायिक कारणांसाठी करता येत नसून हे या कायद्याचे उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हटले गेले होते.
त्याचबरोबर या याचिकेत चित्रपटातील एक डायलॉग वगळण्याची मागणीही करण्यात आली होती. सलमान या डायलॉगमध्ये आपल्या भारत नावाची तुलना देशासोबत करताना दिसत असल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगित देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने यावर निर्णय देत ही याचिका फेटाळली असून हा चित्रपट ५ जूनलाच प्रदर्शित होणार आहे.
