नेटफ्लिक्सच्या आणखी एक वेबसिरीजमध्ये झळकणार नवाजुद्दीन सिद्दीकी


‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमधील गणेश गायतोंडेच्या तोंडी असलेला “कभी कभी लगता है अपुन ही भगवान है”, हा डायलॉग अनेकांच्या तोंडी सर्रास दैनंदिन जीवनात ऐकायला मिळतो. सेक्रेड गेम्समध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेल्या गणेश गायतोंडेच्या भूमिकेला मिळालेल्या पसंतीनंतर नेटफ्लिक्सच्या आणखी एका वेबसिरीजमध्ये नवाजुद्दीन झळकणार आहे.

या वेबसिरीजचे नाव ‘सिरीयस मॅन’ असे असून ही वेबसिरीज मनु जोसेफ यांच्या एका पुस्तकावर आधारित असणार आहे. दलित समाजातील एक मुलगा आणि त्याच्या वडिलांमधील नात्यावर या वेबसिरीजची कथा आधारित असणार आहे. सुधिर मिश्रा या वेबसिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत.

सेक्रेड गेम्सनंतर सिरीयस मॅनच्या निमित्ताने पुन्हा एकदा नेटफ्लिक्ससोबत काम करण्याची संधी मिळाल्याने आनंदी असल्याचे नवाजने म्हटले आहे. तर ‘सेक्रेड गेम्स’प्रमाणेच या चित्रपटातील आपल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी आशा नवाजने व्यक्त केली आहे.

Leave a Comment