मुनगंटीवारांची मिश्किल पद्धतीने पवारांवर टीका


वर्धा- ईव्हीएम मशीनबद्दल माझ्या मनात शंका असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. यावर मिश्किल पद्धतीने एका म्हणीचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वापर केला. ते म्हणाले, नाचता येईना अंगण वाकडे, ही म्हण त्यांच्यासाठीच असून निवडणूक जिंकता येईना, ईव्हीएमवर दोष देत आहे. साधारणतः राजकारण ‘धूल थी चेहरे पे और आईना साफ करते रहे’ अशा पद्धतीने सुरू असल्याची टीका करत त्यांनी पवारांवर निशाणा साधला.

सुधीर मुनगुंटीवार वर्ध्यात जिल्हा परिषद सभागृहात खरीप हंगाम बैठकीसाठी आले होते. मुनगंटीवार म्हणाले, ४७ वर्षे त्यांच्या हातात राज्याची सत्ता होती. पण, त्यांना अद्यापही राज्याचे सगळे प्रश्न सोडवल्याचा दावा करता येत नाही.

Leave a Comment