अपारशक्ती खुराणाचे पहिले-वहिले गाणे तुमच्या भेटीला


दंगल चित्रपटात दमदार अभिनय साकारल्यानंतर बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकणारा आयुष्मान खुराणाचा भाऊ अपारशक्ती खुराणा खुप चर्चेत आला होता. त्यानंतर तो आता एकावेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अपारशक्ती भाऊ आयुष्मान प्रमाणे संगीत क्षेत्रातही आपला हात आजमावला आहे. नुकतेच त्याचे पहिले वहिले पंजाबी गाणे ‘कुडीये नी’ हे रिलीज करण्यात आले आहे. आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिने या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.

बऱ्याच चित्रपटात अपारशक्तीने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. पण या गाण्यात त्याची मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. त्याच्यासोबत या गाण्यात सरगुन मेहता हिने भूमिका साकारली आहे. दोघांचीही ‘कुडीये नी’ गाण्यात केमेस्ट्री अतिशय सुंदर असलेली पाहायला मिळत आहे. ‘दंगल’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच अपारशक्तीने हे गाणे लिहिले होते. हे गाणे त्यानेच कंपोजही केले आहे. अपारशक्तीसोबत नीती मोहनचा स्वरसाजही या गाण्याला चढला आहे.

या गाण्याबाबत बोलताना ताहिराने सांगितले, की हे गाणे घेऊन अपारशक्ती तिच्याकडे आला होता. हे गाणे दहा दिवसात शूट व्हावे, असे तो म्हणाला होता. आम्ही त्यानंतर सलग ४-५ दिवस या गाण्यावर काम केले. या गाण्यावर काम करताना खूप मजा आली. ताहिरा कश्यपने दिग्दर्शित केलेले हे दुसरे गाणे आहे. तिने यापूर्वी ‘टॉफी’ या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले आहे.

Leave a Comment