रनमशीन विराट का करत आहे गोलंदाजीचा सराव ?


नवी दिल्ली – यंदाच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथँम्पटनमध्ये भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात आपला पहिला सामना खेळणार आहे. जगभरातील गोलंदाजांचा कर्दनकाळ अशी ओळख मिळवणारा विराट त्यापूर्वी चक्क गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.


विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी नेट्समध्ये फलंदाजीसोबत गोलंदाजीचाही सराव करताना पाहायला मिळाला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विराट गोलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा भारताकडे भरणा आहे. तरीही गोलंदाजीचा सराव विराट का करत आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. फलंदाज आणि भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराटने शानदार कामगिरी केली आहे. पण त्याला आजवर गोलंदाज म्हणून उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. 48 एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटने गोलंदाजी करताना फक्त 4 गडी बाद केले आहेत.

Leave a Comment