
लवकरच अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांचा कबीर सिंह हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाच्या पोस्टरपासून ट्रेलरपर्यंत सर्वच गोष्टींनी पंसता दर्शवल्यानंतर नुकतेच या चित्रपटातील नवे गाणे आता रिलीज करण्यात आले आहे.
या गाण्याचे बोल तुझे कितना चाहने लगे हम, असे असून या गाण्याला अरिजीत सिंहने गायले असून त्याच्या आवाजातील या गाण्याला प्रेक्षक नक्कीच पसंत करतील, एवढे मात्र नक्की आहे. शाहिदचा वेगळा लूक २ मिनिटे ४३ सेकंदाच्या या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळतो.
तुम्ही ऐकले आहे का कबीर सिंहमधील अरिजीत सिंहच्या आवाजातील हे गाणे
चित्रपटातील बेख्याली हे गाणे याआधी रिलीज करण्यात आले होते. प्रेक्षकांचा या गाण्यालादेखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान संदीप वंगा रेड्डी याचे दिग्दर्शन असलेला ‘कबीर सिंह’ चित्रपट दाक्षिणात्य ‘अर्जून रेड्डी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असून हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
