बोरिवलीकर खात आहेत इडलीसोबत टॉयलेटच्या पाण्यापासून बनवलेली चटणी


मुंबई – सध्याच्या घडीला सोशल मीडियावर मुंबईच्या उपनगरातील बोरीवली स्टेशन जवळील एका इडलीवाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चक्क बोरीवली येथील टॉयलेटमधील पाणी हा इडली आणि मेदूवडा विकणारा चटणीसाठी वापरतो आहे. त्याच्याकडे त्यासंदर्भात विचारणा केली असता त्याने हे टॉयलेट नाही असे म्हटले आहे. पण तो टॉयलेटमधील पाणी कॅनमध्ये आणून भरतो आणि तेच पाणी वापरतो हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आहे. सकाळच्यावेळी अनेकजण नाश्ता करण्यासाठी इडली आणि वडा हा पर्याय निवडतात. असे शेकडो इडलीवाले मुंबई आणि उपनगरांमध्ये आहेत. पण लोकांच्या जीवाशी खेळ बोरीवली स्टेशनजवळच्या या इडलीवाल्याने सुरू केला आहे. या इडलीवाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ सुरज उपाध्याय नावाच्या एका फेसबुक युजरने पोस्ट केला आहे.

दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाने या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या सगळ्या प्रकाराची आम्ही चौकशी करत आहोत टॉयलेटमधील पाणी हा इडलीवाला चटणी तयार करण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले आहे. आणखी काय रस्त्यावर ठेला लावणारा हा इडलीवाला करतो? त्याच्याप्रमाणेच हे पाणी आणखी कोण कोण ठेलेवाले वापरत आहेत याची चौकशी आम्ही सुरू केली असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी शैलेश आढाव यांनी म्हटले आहे.

Leave a Comment