कोंकणा सेन शर्माच्या ‘अ मान्सुन डेट’चा ट्रेलर रिलीज


लवकरच एका शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांत दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा दिसणार आहे. या शॉर्ट फिल्मचे नाव ‘अ मान्सुन डेट’, असे असून नुकताच या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ही शॉर्ट फिल्म ‘ईरॉस नाऊ’ या डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.


तनुजा चंद्रा हे ‘अ मान्सुन डेट’ या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन करत आहेत तर या शॉर्ट फिल्मची कथा गजल दहिवाल यांनी लिहिली आहे. समलैंगिक विषयावर आधारित या शॉर्ट फिल्मचे कथानक आहे. आत्तापर्यत बरेचसे चित्रपट बॉलिवडमध्ये समलैंगिक विषयावर तयार झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच सोनम कपूरच्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातही हाच विषय हाताळण्यात आला होता. आता ‘अ मान्सुन डेट’ या शॉर्ट फिल्ममधुनही याच विषयाची मांडणी करण्यात आली आहे.

ही शॉर्ट फिल्म दक्षिण अमेरिकेचा सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल मानल्या जाणाऱ्या साऊथ एशिअन फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाखवण्यात आली आहे. कोंकणा सेन शर्मासोबत यामध्ये रघुवीर यादव याने भूमिका साकारली आहे. ही शॉर्ट फिल्म ‘ईरॉस नाऊ’वर ५ जून पासून पाहता येईल.

Leave a Comment