
मराठी सिनेसृष्टीने बॉलीवूडचे अनुकरण करण्यासाठी आणि डिजीटल जमान्यात टिकून राहण्यासाठी कात टाकत बोल्ड आशयाचे चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘टकाटक’ हा चित्रपट म्हणायला हवा. नुकतेच या चित्रपटातील धम्माल गाणे रिलीज करण्यात आले आहे.
या गाण्याचे ‘आपला हात जगन्नाथ’ असे बोल असून चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अल्पावधीतच हा ट्रेलर चर्चेचा विषय ठरल्यानंतर हे गाणे आता रिलीज करण्यात आले आहे. आनंद शिंदे यांनी या गाण्याला आवाज दिला असून हे गाणे वरूण लिखाते यांनी संगीतबद्ध केले आहे.
प्रथमेश परबच्या ‘टकाटक’मधील धम्माल गाणे रिलीज
टाईमपास फेम प्रथमेश परबचा खास डान्स जय अत्रे लिखित या गाण्यात पाहायला मिळत आहे. प्रथमेशची चित्रपटात जोडी रितिका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत जमली असल्यामुळे एका नव्या कोऱ्या जोडीची ‘टकाटक’ केमिस्ट्रीही प्रेक्षकांना या चित्रपटात अनुभवायला मिळेल. हा चित्रपट येत्या २८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
