भारताच्या संविधानातील समतेचा अधिकार यावर आधारित ‘आर्टिकल १५’ची कथा


लव्हस्टोरी पलीकडील अनेक कथा बॉलिवूडमध्ये सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात विशेष म्हणजे प्रेक्षकांचा समाजातील वास्तवावर आधारित या कथांनाही उत्तम प्रतिसादही मिळताना दिसत आहे. समाजातील वास्तवावर आधारित आता असाच ‘आर्टिकल १५’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. समाजामध्ये निष्पापांचे जाणारे बळी, जातीच्या नावाखाली उच्च आणि मागास अशा झालेल्या विभागणीची कथा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच अभिनेता आयुष्मान खुरामा याविरोधात लढणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.

आयुष्मानची समाजामध्ये सुरू असलेले गुन्हे दडपण्याचा चालू असणारा प्रयत्न मोडीत काढण्यासाठी चाललेली धडपड या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ‘आर्टिकल १५’ चित्रपटाची कथा भारताच्या संविधानातील समतेचा अधिकार यावर आधारित असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर देशात जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव केला जाऊ शकत नाही, हेच मांडण्यात येणार आहे. हा चित्रपट २८ जूनला प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे.

Leave a Comment