तापसीच्या ‘या’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल


‘बदला’ चित्रपटानंतर ‘गेम ओव्हर’ चित्रपटातून अभिनेत्री तापसी पन्नु ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली होती. या चित्रपटाचा थरारक ट्रेलर आता रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.

एक सायकॉलॉजिकल थ्रिलर असा ‘गेम ओव्हर’ हा चित्रपट असून तापसी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका आजाराने ग्रस्त असल्याचे पाहायला मिळते. तिच्यावर काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा प्रभाव पाहायला मिळतो. ती त्यामुळे भयभीत असते. यालाच ‘अॅनीव्हर्सरी रिअॅक्शन’ असे म्हटले गेले आहे. यामध्ये एखादी घटना घडलेल्या दिवशी पुन्हा आठवून त्या व्यक्तीला त्याची भीती वाटू लागते. हिच भूमिका तापसीने या चित्रपटात साकारली आहे.

हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा ३ भाषांमध्ये ‘गेम ओव्हर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सेन्सॉर बोर्डाचेही प्रमाणपत्र या चित्रपटाला मिळाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन सारावान यांनी केले आहे. तर, एस. शशिकांत यांनी निर्मिती केली आहे.

Leave a Comment