विश्वचषकात भारताचा मानहानीकारक पराभव करणार गोलंदाज झाला गायक


तुमच्या पैकी कितीजणांनी 1999 साली खेळवली गेलेली विश्वचषक स्पर्धा पाहिली असेल हे आम्हाला माहित नाही. पण त्यावेळी एका संघाकडून भारताचा मानहानीकारक पराभव झाला होता. तो पराभव भारताच्या खुप जिव्हारी लागला होता. कारण तो पराभव त्यावेळी दुबळ्या समजल्या जाणाऱ्या एका संघाकडून झाला होता. पण आता भारताचा मानहानीकारक पराभव करणारा गोलंदाज सध्या गायक झाला असून त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्याचबरोबर त्याच्या या व्हिडीओला युझर्सकडून पसंती आणि कौतूक देखील केले जात आहे.


त्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात झिम्बाब्वे संघाकडून खेळणाऱ्या हेन्री ओलंगा याने 5 चेंडूत 3 धावा देऊन भारताचा साकार होणारा विजय रोखला होता. सध्याच्या घडीला ओलंगा क्रिकेटपासून दूर असून तो ऑस्ट्रेलियाचा नागरिक झाला आहे. दरम्यान मंगळवारी रात्री त्याने आपल्या गाण्याने लोकांच्या हृदयावर राज्य केले आहे. ऑस्ट्रेलियातील एक खाजगी वाहिनी चॅनल 9च्या सिगिंग रियालिटी शो द व्हाईस लाईव्हमध्ये ओलंगा सहभागी झाल होता. त्यादरम्यान त्याने गायलेल्या गाण्यावर चारही परिक्षक आणि दर्शक मंत्रमुग्ध झाले. दिग्गज क्रिकेटपटूंनी ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या गाण्याचे कौतूक केले आहे.

Leave a Comment