
प्रत्येक वेळी आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर्स सोशल मीडियात सध्या प्रसिद्ध असणारे व्हॉट्सअॅप घेऊन येत असते. पण व्हॉट्सअॅपवर आता लवकरच जाहिराती दाखवल्या जाणार आहेत. तर युजर्सला व्हॉट्सअॅपवर 2020 पर्यंत जाहिराती पाहता येणार आहेत. मात्र कोणताही अडथळा व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना येणार नसल्याचे सांगितले जात आहे.
आता व्हॉट्सअॅपवर देखील दिसणार जाहिराती
फेसबुकने काही वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅप विकत घेतल्यानंतर व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार का असे प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागत नसून जाहीराती मात्र पाहायला मिळणार आहेत. पण जाहिरातींचा अडथळा चॅटिंग करताना येणार नसला तरीही व्हॉट्सअॅपवरील स्टेटस पाहताना जाहिराती पाहाव्या लागू शकणार आहेत. तसेच सध्या स्टेटसमध्ये टेक्स, फोटो किंवा व्हिडिओसुद्धा शेअर करता येतो.
