
लंडन – काल विश्वचषक स्पर्धेच्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला यांच्यातील खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने एक नवा इतिहास रचला आहे. मॉर्गनने इंग्लंडसाठी खेळलेला हा २००वा एकदिवसीय सामना असून तो अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात रचला इतिहास
२००६ साली स्कॉटलंडविरुद्ध डबलिनमध्ये जन्मलेल्या मॉर्गनने पहिला सामना खेळला होता. त्याने त्यानंतर एकूण २२ सामन्यात आयर्लंडसाठी खेळल्यानंतर इंग्लंडसाठी तो खेळू लागला. काल दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मॉर्गन आपला २०० वा एकदिवसीय सामना खेळला. पॉल कॉलिंगवुडने यापूर्वी इंग्लंडकडून १९७ तर जेम्स अँडरसन १९४ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
