आयुष्मानच्या आर्टिकल 15चा टीझर रिलीज


प्रेक्षक अभिनेता आयुष्मान खुराणाच्या ‘आर्टिकल १५’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आल्यानंतर उत्कंठा वाढवणाऱ्या या पोस्टरनंतर चित्रपटाटा टीझर रिलीज करण्यात आला आहे.


‘आर्टिकल १५’ वर चित्रपटाची कथा भारताच्या संविधानातील समतेचा अधिकार यावर आधारितअसणार आहे. देशात जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव केला जाऊ शकत नाही, असा डायलॉग टीझरमध्ये ऐकायला मिळतो.

या चित्रपटाच्या माध्यमातून या सर्वावरून देशात होणारे भेदभाव आणि यातून होणाऱ्या आत्महत्या हे समाजातील एक भयानक वास्तव प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. फरक खूप केला, आता बदल घडवणार, असा डायलॉग आयुष्मानच्या तोंडून ऐकायला मिळतो. चित्रपटाचा ट्रेलर ३० मे रोजी रिलीज करण्यात येणार आहे. तर चित्रपट २८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.