‘साहो’च्या नव्या पोस्टरमध्ये पाहा प्रभासचा खास लूक


लवकरच ‘साहो’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच नुकतेच या चित्रपटाचे एक नवे पोस्टर प्रभासने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. यासोबतच फोटोला एक कॅप्शन देखील दिले आहे.


पोस्टरला ‘साहो’ चित्रपटाचे दुसरे पोस्टर, असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे. प्रभासने या पोस्टरमध्ये काळ्या रंगाचे लेदर जॅकेट घातले आहे. तो बाईक रायडींग करताना फोटोत दिसत आहे. प्रभाससोबत यात श्रद्धा कपूर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे.

हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला सिनेमागृहे गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील एक व्हिडिओ ३ मार्चला म्हणजेच श्रद्धाच्या वाढदिवशी शेअर करण्यात आला होता.श्रद्धाच्या अॅक्शन सीनची झलक ज्यात पाहायला मिळाली. तर प्रभासच्या वाढदिवशीही चित्रपटातील स्टंटची झलक प्रदर्शित करण्यात आली होती. प्रेक्षकांची या व्हिडिओला चांगलीच पसंतीही मिळाली. अशात आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment