‘पागलपंती’मध्ये जॉन-अनिलची जुगलबंदी


काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद त्याच्या या चित्रपटाला मिळाला नाही. पण त्याने या चित्रपटाच्या अपयशानंतरही ‘बाटला हाऊस’ चित्रपट साईन केल्यानंतर तो आता आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘पागलपंती’ असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही यासोबत जाहीर करण्यात आली होती. परंतु, आता या तारखेत बदल करण्यात आला असून आता हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॉनशिवाय यात इलियाना डिक्रुझ, अनिल कपूर, अर्शद वारसी, उर्वशी रौतेला, सौरभ शुक्ला, क्रिती खरबंदा आणि पुलकीत सम्राट या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत. अनीस बझमी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

Leave a Comment