खुद्द कतरिनानेच सलमान खानला घातली लग्नाची मागणी


बी-टाऊनसह तमाम रसिक प्रेक्षकांना ‘दबंग’ सलमान खानच्या लग्नाची बऱ्याच दिवसापासून आतुरता आहे. पण, नेहमी लग्नाकडे सलमान खान दुर्लक्ष करताना दिसतो. आजवर बऱ्याच अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले आहे. प्रेक्षकांना त्याची आणि कतरिनाची जोडी देखील फार आवडते. त्या दोघांनी एकत्र यावे, अशीही चाहत्यांची इच्छा आहे. तर, लवकरच चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. सलमान खानला खुद्द कतरिनानेच लग्नाची मागणी घातली आहे.

लवकरच चाहत्यांची कतरिना आणि सलमान खानचे लग्न पाहण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. पण, दोघांच्याही लग्नाचा सीन खऱ्या आयुष्यात नाही, तर त्यांच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचे नवनवे प्रोमो येत आहेत. नुकताच या चित्रपटाचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. कतरिना या प्रोमोमध्ये सलमानला लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एकेकाळी कतरिना आणि सलमान खानच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील सुरू होत्या. पण, दोघेही अनेकदा एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगतात. या दोघांची ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता ‘भारत’ चित्रपटातही ते एकत्र येणार असल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता आहे. हा चित्रपट येत्या ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट यावर्षीचा सुपरहिट चित्रपट राहणार आहे, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काय कमाल दाखवतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Leave a Comment