ऋतिक रोशन ‘काबिल’च्या प्रमोशनसाठी चीनला जाणार


बॉक्स ऑफिसवर अभिनेता ऋतिक रोशन आणि यामी गौतमच्या २०१७ साली आलेल्या ‘काबिल’ या ड्रामा थ्रिलर चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट आता चीनमधील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जूनला हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर याचा खास प्रीमियर २ जूनला आयोजित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ऋतिक या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चीनच्या दौऱ्यावर जाणार असून तो याठिकाणी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. ऋतिकचे चीनमध्ये अनेक चाहते असल्यामुळे, ऋतिक प्रीमियरदरम्यान आपल्या चाहत्यांशी संवादही साधणार आहे. तो ३० मे रोजी चीनसाठी रवाना होणार आहे.

ऋतिक आणि यामीने या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली. या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच चित्रपट विश्लेषकांकडूनही कौतुकाची थाप मिळवली. आता हा चित्रपट चीनमधील प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment