‘जयेश भाई जोरदार’साठी गुजराती बनणार रणवीर सिंह


आत्तापर्यंत प्रेक्षकांनी अभिनेता रणवीर सिंहच्या वेगवेगळ्या भूमिका पाहिल्या आहेत. रणवीरच्या ‘बॅन्ड बाजा बारात’ ते अगदी ‘गली बॉय’, या चित्रपटातील सर्वच भूमिकांनी प्रेक्षकांवर छाप पाडली. तो आता लवकरच एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे.


त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘जयेश भाई जोरदार’ असे असून मनिष शर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर पटकथा दिव्यांग ठक्कर हे करणार आहेत. ‘८३’ चित्रपटानंतर या चित्रपटाच्या शूटिंगला रणवीर सुरुवात होणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत अधिकृत माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आगामी ‘८३’ या चित्रपटात रणवीर सध्या व्यस्त आहे. तो कपिल देव यांची भूमिका या चित्रपटात साकारत आहे. हा चित्रपट १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्व चषकावर आधारित आहे. ‘८३’च्या वर्ल्डकपचा थरार या चित्रपटात पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण झळकणार असल्यामुळे रणवीर आणि दीपिकाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Leave a Comment