विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचे समर्थन करणार निक जोनास


बॉलिवूडमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. ते दोघेही अनेक कार्यक्रमांना एकत्र जातात. आताही त्या दोघांनी ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त त्यांच्या खास दिसण्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ निकच्या एका चाहत्याने पोस्ट केला असून निक आणि त्याच्या भावांनी त्यामध्ये चाहत्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली आहेत.


निकला एका चाहत्याने विचारले की, क्रिकेटची प्रियंकाने त्याला ओळख करून दिली का? आणि निक यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या टीमचे समर्थन करणार? निक या प्रश्नांचे उत्तर देताना म्हणाला की, मला क्रिकेटची ओळख प्रियंकानेच करून दिली. मी तिच्या काकांमुळे क्रिकेटशी जास्त जोडला गेलो. वर्ल्ड कपमधील टीम्सबद्दल मला फारशी माहिती नसल्याने नक्की कोणत्या टीमला मी पूर्णपणे पाठिंबा देईन हे मला माहित नाही पण, भारताच्या संघाला मी नक्कीच चिअर करणार असल्याचे निकने सांगितले.

निकला याच व्हिडिओमध्ये चाहत्यांनी असेही विचारले की, त्याचा आवडता म्युझिक व्हिडिओ कोणता? निकने यावर ‘सकर’चे नाव घेतले. प्रियंकाने सुद्धा निकच्या भावाने केलेल्या या व्हिडीओमध्ये काम केले आहे. निकच्या चाहत्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये निकसोबत त्याचे दोन भाऊसुद्धा आहेत. सकरचे पॅलेसमध्ये शुटिंग करताना आम्हाला खूप मजा आल्याचे निक म्हणाला.

Leave a Comment