
यंदाच वर्ष कॉमेडिनय कपिल शर्मासाठी आनंदाच्या बातम्यांनी परिपूर्ण ठरत असून प्रेक्षकांचा ‘द कपिल शर्मा शो’ला सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच आणखी एक आनंदाची बातमी आता आहे. लवकरच कपिलच्या घरी पाळणा हलणार असून यासंदर्भातील वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिले आहे. त्यात कपिलची पत्नी गिन्नी छत्रथ गरोदर असल्याचे म्हटले आहे.
कपिल शर्माच्या घरी हलणार पाळणा
जवळपास पाच महिन्यांपूर्वी कपिल आणि गिन्नीने लग्नगाठ बांधली. ते कॉलेजमध्ये असल्यापासून रिलेशनशिपमध्ये होते. कपिलची आईसुद्धा गिन्नी गरोदर असल्याचे कळताच मुंबईत त्यांच्यासोबत राहायला आली आहे. कपिलने गिन्नीसोबत अधिक वेळ घालवता यावा म्हणून त्याच्या शूटचे वेळापत्रक त्याप्रकारे आखून घेतले आहे. कपिलच्या घरी येत्या डिसेंबर महिन्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्यामुळे कपिल शर्मा लग्नानंतर वर्षभरातच बाबा होणार आहे.
