मानसिकदृष्ट्या आजारी हा रूग्णाच्या पोटातून बाहेर काढले ८ चमचे, २ टूथब्रश आणि १ चाकू


हिमाचल प्रदेशातील लाल बहादुर शास्त्री सरकारी रूग्णालयातील डॉक्टरांनी एका रूग्णाच्या पोटातून ८ चमचे, २ स्क्रू ड्रायव्हर, २ टूथब्रश आणि स्वयंपाक घरात वापरातील १ चाकू बाहेर काढला आहे. हे सगळे ३५ वर्षीय रूग्णाच्या पोटातून बाहेर काढल्याने डॉक्टरांनी धक्का बसला. या रूग्णाला २४ मे रोजी या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आणि आम्ही त्याच्या पोटातून चमचे, स्क्रू ड्रायव्हर आणि चाकू बाहेर काढला. या रूग्णाचे नाव काय होते ते समजू शकलेले नाही.

या रूग्णावर आम्ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. मानसिकदृष्ट्या हा रूग्ण आजारी असल्याची माहिती रूग्णालयातले डॉक्टर निखिल यांनी दिली. या रूग्णाची प्रकृती आता स्थिर असून हा प्रकार दुर्मीळ आहे, या रूग्णाने या वस्तू मानसिक आजार असल्यामुळेच गिळल्याचेही डॉक्टर निखिल यांनी म्हटले आहे.

Leave a Comment