अरे देवा, अर्नब गोस्वामी म्हणतात गुरुदासपुरमधुन सनी लिओन आघाडीवर


17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे कल आता समोर येत आहे. यात पुन्हा एकदा एनडीएने स्पष्ट बहुमत मिळाले असून अनेक माध्यमांनी यासाठी जोरदार तयारी केली होती. पण याचदरम्यान रिपब्लिक टीव्हीवर निवडणुकीच्या निकालाची माहिती देताना अर्नब गोस्वामी यांनी चक्क सनी लिओन निवडणुकीला उभी असून गुरुदासपुरमधुन आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.


पण खर तर या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर अभिनेते सनी देओल यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर अर्नब गोस्वामी हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. यात विशेष म्हणजे सनी लिओन हिने देखील अर्नब गोस्वामी यांना टॅग करत किती मतांनी आघाडीवर असा टोला लगावला आहे.

Leave a Comment