अंगणातील गवत कापले नाही म्हणुन घरमालकाला २० लाखांचा दंड


रखरखत्या उन्हात आपल्या अंगणातील गवत कापण्याचे काम आपल्यापैकी कोणीही करणार नाही. पण एका व्यक्तीला अंगणातील गवत न कापणे चांगलेच महागात पडले आहे. घरासमोरील लॉनमधील गवत वाढल्याने आणि ते न कापल्याने एका व्यक्तीला तब्बल २० लाख रूपयांचां दंड ठोठावण्यात आला आहे.

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये जिम फिकन ही व्यक्ती राहते. १० इंचापेक्षा अधिक त्यांच्या लॉनमधील गवत वाढल्यामुळे ३० हजार अमेरिकन डॉलर इतका दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम भारतीय चलनानुसार २०,९०,७९६ रूपये एवढी होते. हा दंड शहर प्रशासनाकडून ठोठावण्यात आला आहे. फिकन गेल्या दोन महिन्यांपासून शहरात नव्हते. त्यांच्या आईची तब्येत खराब होती. त्यामुळे ते घरी नव्हते. ही माहिती त्यांनी घरासमोर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला त्यांनी सांगितले की, हा दंड फार जास्त आहे.

याबाबत माहिती देताना फिकन यांनी सांगितले की, गवत कापण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीला कामावर ठेवले होते. पण त्याचा अचानक मृत्यू झाला. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांची गवत कापण्याची मशीन तुटलेली होती. इतक्यात मला नोटीस आली. २० लाख रूपये दंड भरा. फिकन सांगतात की, दंड भरण्यासाठी त्यांच्यांकडे इतकी रक्कम नाही. स्थानिक प्रशासनाचे यावर म्हणणे आहे की, याआधी अनेकदा फिकन यांना नोटीस पाठिवली होती. पण फिकन यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही. आता स्थिती अशी आहे की, त्यांचे घरही त्यांच्या हातून जाऊ शकते. हे प्रकरण सध्या कोर्टात गेले आहे. फिकनच्या वकिलांनी लॉनमधील गवत का कापले गेले नाही, याची वेगवेगळी कारणे सांगितले आहेत. त्यामुळे आता कोर्ट यावर काय निकाल देते हे बघणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment