या महिलेने केला सुंदर असल्यामुळे नोकरी मिळत नसल्याचा दावा


तुम्ही एखाद्या रिकामटेकड्याला नोकरी मिळण्याचे कारण विचारले तर त्याच्याकडे अनेक कारणे तयार असतात. पण एखाद्या व्यक्तीला तिच्या सुंदरतेमुळे नोकरी मिळत नसल्याचे तुम्हाला जर विचित्रच वाटेल. पण 33 वर्षीय आयरिन जिने कायद्याचे शिक्षण घेतले असून तिने तिच्या शिक्षणाच्या जोरावर नोकरी शोधण्याचा खुप प्रयत्न केला. पण तिच्या प्रयत्नांना अजिबात यश आले नाही. शेवटी खचून न जाता स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

आयरिनने स्वतःची रिटेल कंपनी सुरु केली. ती ज्याद्वारे ती विंटेज कपड्यांची ऑनलाइन विक्री करते. पण ती तिच्या सौंदर्याला तिच्या करिअरमधील सर्वात मोठी अडचण समजते. आयरिनानुसार, तिला सुंदरतेमुळे आतापर्यंत नोकरी मिळाली नाही.

रशियन वंशाच्या आयरिना कोवाला लंडनमध्ये नोकरी हवी होती. आयरीना सांगते की, मी फार आकर्षित असल्या कारणामुळे लंडनमध्ये मला नोकरी मिळाली नाही. जिथेही नोकरीसाठी मी जाते तिथे महिला मला घेत नाही, कारण त्या मला घाबरतात. तर मला पुरुष गंभीरतेने घेत नाहीत. त्यांना असे वाटते की, मला त्यांनी घेतले तर त्यांचे कामावर लक्ष लागणार नाही.

आधी काही क्लाएंट्ससाठी बिझनेस डेव्हलपमेंट म्हणूण आयरीना काम करत होती. पण तिचे मत आहे की, तिच्या सुंदरतेने तिचे करिअर खराब केले. यासंदर्भात ‘द सन’ या ब्रिटीश वृत्तपत्राशी बोलताना तिने सांगितले की, माझे आकर्षक असणे मुलाखतीदरम्यान आणि नोकरी मिळाल्यानंतर दोन्ही स्तरांवर माझ्यासाठी नकारात्मक ठरले. मी ज्या रिक्रूटमेंट एजंटच्या संपर्कात होते, मला त्याने केसांचा रंग बदलण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून मी अधिक प्रोफेशनल दिसावी. पण मला नोकरी मिळाली नाही.

आयरिना पुढे सांगते की, केवळ केसांचा रंगच मी बदलला नाही तर डोळे चांगले असूनही मी चष्मा वापरू लागले. मला माझ्या एक्स बॉसने तर स्पष्टपणे सांगितले होते की, पुढे जाण्यासाठी तू तुझ्या लुक्सचा वापर करणे बंद कर. पण मी असे काहीच केले नव्हते. मी जशी आहे तशी आहे. ती सांगते की, मी जास्त मेकअपही करत नाही. कारण तिचे डोळे आणि ओठ आधीच मोठे आणि आकर्षक आहेत. मला वाटते कॉर्पोरेट कल्चरसाठी मी जास्त ग्लॅमरस आहे आणि यात मी फिट बसत नाही. लग्न झालेले पुरूष मला नोकरीवर ठेवत नाहीत, कारण जर त्यांची पत्नी ऑफिसमध्ये आणि त्यांनी मला पाहिले तर त्यांच्यात वाद होऊ शकतात.

Leave a Comment