
येत्या ईदच्या मुहुर्तावर अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षित भारत हा चित्रपट रिलीज होणार आहे. यादरम्यान चित्रपटातील अनेक गाणी तुमच्या भेटीला आली. त्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील ‘तुर्पेया’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.
हे गाणे सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. या गाण्यात कामासाठी गेलेल्या मात्र अजूनही गावच्या मातीशी नाळ जुळलेल्या भारतची कथा पाहायला मिळते. या गाण्याचे शीर्षक मै तुर्पेया घर से दूर, असे असून यात नेव्ही ऑफिसरच्या वेशभूषेत सलमान दिसत आहे.
सलमानच्या भारतमधील नवे गाणे तुमच्या भेटीला
विशाल-शेखर यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. दरम्यान याआधी चित्रपटातील ‘स्लो मोशन’, ‘जिंदा’, ‘चश्नी’ आणि ‘अैथे आ’सारखी अनेक गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. अली अब्बास जफर यांचे दिग्दर्शन असलेला ‘भारत’ चित्रपट येत्या ५ जूनला प्रदर्शित होणार आहे.
