‘पीएम मोदी’ बायोपिकचे नवे पोस्टर रिलीज


उद्या बॉक्स ऑफिसवर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपटाला रिलीज होण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. सोमवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते या बायोपिकचे एक पोस्टर रिलीज करण्यात आल्यानंतर नुकतेच या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.


विवेक ओबेरॉयचा मोदींच्या वेशभूषेतील लूक या पोस्टरमध्ये पाहायला मिळत असून विवेक यात आरती करताना दिसत आहे. तर मागील पोस्टरप्रमाणेच या पोस्टरवरही आ रहा हूँ दोबारा, अब कोई रोक नहीं सकता, या ओळी लिहिल्या आहेत. अडथळ्यांनंतर होणारे चित्रपटाचे प्रदर्शन आणि लोकसभा निवडणूकांचा निकाल या दोन्हीचा विचार करत पोस्टरवर हे कॅप्शन दिल्याचे म्हटले जात आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये नुकतेच या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग पार पडले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीदेखील यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment