इंग्लंडचा सध्याचा संघ सर्वोत्तम – मायकल वॉन


लंडन – पाकिस्तानचा एकदिवसीय मालिकेत ४-० ने धुव्वा उडवल्यानंतर मंगळवारी इंग्लंडच्या संघाने आगामी विश्वचषकासाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. इंग्लंडचा विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. माजी खेळाडू मायकल वॉन यांनी त्यापूर्वी सध्याच्या इंग्लंड संघाला आजवरचा सर्वोत्तम संघ असल्याचे म्हटले आहे.

वॉन म्हणाले की, आजवर इंग्लंडचे अनेक संघ मी पाहिले आहेत. पण सध्याचा इंग्लंडचा ईऑन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालील संघ हा आतापर्यंतचा सर्वाधिक मजबूत संघ आहे. या विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा इंग्लंड प्रबळ दावेदार असून ही स्पर्धा जिंकण्याची इंग्लंड संघाकडे नामी संधी असणार आहे.

यापूर्वी इंग्लंडच्या संघाला क्रिकेट विश्वातील अनेक क्रिकेट पंडितांनी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले आहे. आजवर १९७९, १९८७ आणि १९९२ साली इंग्लंडने अंतिम फेरी गाठली आहे. पण इंग्लंडला एकदाही विश्वचषक जिंकण्यात यश आले नाही.

विश्वचषकासाठी यजमान इंग्लंडचा संघ – ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

Leave a Comment