स्वप्नील जोशीच्या ‘मोगरा फुलला’चे शीर्षक गीत रिलीज


लवकरच ‘मोगरा फुलला’ हा मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे शीर्षक गीत रिलीज करण्यात आले आहे. यापूर्वी या चित्रपटातील ‘मनमोहिनी’ हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. आता या शीर्षक गीतामध्ये शंकर महादेवन यांच्या आवाजाची जादु अनुभवायला मिळते.

संगीतकार रोहित राऊत याने ‘मोगरा फुलला’ या चित्रपटाच्या शिर्षकगीताला संगीत दिले आहे. तर, हे गाणे अभिषेक कणकरने लिहिले आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशीसह नीना कुलकर्णी, सई देवधर या अभिनेत्रीदेखील झळकणार आहेत. नायकाच्या मनाच्या विविध भावभावनांना या गाण्यातून स्पर्श केला आहे. या गाण्याचा व्हिडिओ स्वप्नीलने त्याच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे देखील या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या काकाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट येत्या १४ जूनला रिलीज होणार आहे.

Leave a Comment