या दिवशी रिलीज होणार महेश भट्ट यांचा ‘सडक-२’


दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या आगामी ‘सडक-२’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, पुजा भट्ट, संजय दत्त हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यात आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार ती तारीख देखील जाहिर करण्यात आली आहे.

हा चित्रपट १० जुलै २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने शूटिंगचा एक फोटो शेअर करून चित्रीकरणाला सुरूवात झाल्याचे सांगितले होते. आलिया पहिल्यांदाच तिच्या वडिलांच्या दिग्दर्शनाखाली भूमिका साकारत आहे. आदित्य रॉयसोबत आलियाने ‘कलंक’ चित्रपटात काम केले आहे. ‘सडक-२’ चित्रपटात ती एक महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. तर, पुजा भट्ट ही फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात येणार आहे.

Leave a Comment