मिसेस खिलाडीने मोदींच्या ध्यानाचा असा घेतला समाचार


लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा रविवारी पार पडला. तत्पुर्वी नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीचा प्रचार पुर्ण झाल्यानंतर केदारनाथला प्रस्थान केले होते. त्यादरम्यान त्यांनी त्याठिकाणी एका गुहेत ध्यानधारणा केली होती. सोशल मीडियावर याची खुप चर्च झाली. त्यांचे अनेक पोज असलेले ध्यानधारणेचे फोटोही व्हायरल झाले. तर विरोधकांनी मोदींच्या ध्यानधारणेला नौटंकी देखील संबोधले होते. अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिने नेमके याच गोष्टींवर भाष्य करणारे ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे.


अनेक अध्यात्मिक भावमुद्रा गेल्या काही दिवसात पाहिल्यानंतर ‘मेडिटेशन फोटोग्राफी : पोज अँड अँगल्स’ या विषयावर कार्यशाळेची मालिका चालवायचे मी आता ठरवले आहे. वेडिंग फोटोग्राफीनंतर ही सर्वात मोठी गोष्ट ठरेल असे मला वाटते, असे कॅप्शन तिने शेअर केलेल्या फोटोला दिले आहे. असंख्य युजर्सच्या ट्विंकलचे हे ट्विट पचनी पडलेले नाही. तिला काही जणांनी समजवण्याचा प्रयत्न केला तर काहींनी अक्षय कुमारला यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अक्षय कुमार हा मोठा चाहता आहे. त्याने त्यांच्या योजनांचा प्रचार करणाऱ्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्याने अलिकडेच मोदींची घेतलेली अराजकीय मुलाखतीत अनेक कारणांनी चर्चेत होती. यामध्ये मोदी यांनी ट्विंकल खन्ना करीत असलेल्या ट्विटरचाही उल्लेख मोदी यांनी केला होता.

Leave a Comment