वनप्लसच्या जाहिरातीत झळकणार ‘आयर्न मॅन’


आपल्या मार्केटिंग आणि ब्रँडच्या जाहिरातीसाठी ‘आयर्न मॅन’ आणि अॅव्हेंजर्स सीरिजचा सुपरहीरो रॉबर्ट डाउनीसोबत प्रीमिअम स्मार्टफोन बनवणारी कंपनी ‘वनप्लस’ ने नुकताच करार केला आहे. वनप्लस या स्मार्टफोनची स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये भूमिका महत्वपूर्ण आहे. आपल्या ब्रँड फिलॉसॉफी ”नेव्हर सेटलवर” या कंपनीचा विश्वास असून याच मार्गाने ती काम करते.

आपल्या यूझर्सना ‘वनप्लस’ नेहमीच वेगळे आणि चांगले फीचर्स देण्याचा प्रयत्न करते म्हणूनच रॉबर्टला आपल्यासोबत घेऊन ब्रँडच्या विस्ताराचा कंपनी प्रयत्न करत आहे. तसेच या लोकप्रिय अमेरिकेच्या अभिनेत्यासोबत नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या (वनप्लस 7 सिरीज) मोहिमेसाठी वनप्लसची क्रिएटिव्ह टीम काम करत आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून रॉबर्ट डाउनीला ओळखले जाते. टेक्नॉलॉजी आणि भविष्याचा वेध घेणारे त्यांचे अनेक चित्रपट असतात. त्यामुळे वनप्लससाठी रॉबर्ट डाउनी हा खूप महत्वाचा घटक आहे. रॉबर्ट डाउनी एक बहुमुखी व्यक्तीमत्व असून जगभर त्यांचे लाखो चाहते आहेत. याच गोष्टीचा फायदा कंपनीला होणार आहे.

वनप्लसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पेटे लॉ यांनी या असोसिएशनबद्दल बोलताना सांगितले की, कोणतीही गोष्ट वेगळे करण्यात वनप्लस विश्वास ठेवते. रॉबर्ट डाउनीसोबत काम करताना त्यांचे काम आणि समर्पणाची झलक आमच्या विचारधारेशी मिळते. म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आणि हा आमच्यासाठी एक असाधारण अनुभव होता.

रॉबर्ट डाउनी कंपनीविषयी आपले मत व्यक्त करताना म्हणाला की, तंत्रज्ञानाला पुढे घेऊन जाणारा युवा ब्रँड ‘वनप्लस 7 प्रो’ एक अतिशय चांगला फोन आहे. क्वालिटी आणि क्राफ्ट्समॅनशिपच्या सिद्धांतांच्या आधारावर यांनी मला एका योजनेत मदत करण्याचे आव्हान दिले होते. विशेष म्हणजे तंत्रज्ञानाची मला खूप आवड असल्यामुळे या मोहिमेत मी सहभागी झालो. या स्मार्टफोनमध्ये इनोव्हेटिव्ह डिझाइनचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन अधिक प्रभावशाली वाटतो.

वनप्लस 7 सिरीजच्या लॉन्चसोबतच रॉबर्ट डाउनीची ही जाहिरात भारत आणि चीनमध्ये पहायला मिळत आहे. वनप्लस सोबत या अभिनेत्याचे काम करणे या ब्रँडच्या विकासात भर पाडणारा एक महत्वाचा घटक ठरणार आहे. कारण रॉबर्ट डाउनी जु. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि यशस्वी कलाकार आहे. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत.

वनप्लसने मार्केटिंग आणि ब्रँड जाहिरातीसाठी तरूणांवर लक्ष केंद्रीत केले आहे. विशेष म्हणजे आपल्या ब्रँडसोबत रॉबर्ट डाउनीला जोडून वनप्लसने सिद्ध केले आहे की युझर्संना आम्ही काही तरी नवीन देऊ शकतो. 14 मे रोजीच या कंपनीने वनप्लस 7 आणि वनप्लस 7 प्रो लॉन्च केले आहेत. हा एक अल्ट्रा-प्रिमीअम स्मार्टफोन असून जो अनेक चांगल्या फिचर्समध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment