विश्वचषकासाठी हे पंच घेणार एवढे मानधन


क्रिकेट हा खेळ अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. कारण क्रिकेट या खेळाचे सध्याच्या घडीला जगभरात सर्वाधिक चाहते आहेत आणि आपल्या देशात म्हटले तर या खेळाचा मोठा चाहतावर्ग आहे. आजवर आपण अनेक क्रिकेटपटुंच्या लाईफस्टाईल, कुटुंब आणि ते करत असलेल्या कमाईबद्दल आम्ही तुम्हाला सांगतच असतो. पण आज आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या मैदान पंचगिरी करणाऱ्या पंचाच्या कमाईबद्दल सांगणार आहोत.क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण कामगिरी ही पंचांची असते कारण त्यांच्या एका निर्णयामुळे कोणत्याही संघाचा विजय किंवा पराजय होऊ शकतो. त्यामुळे पंचांची आयसीसी खुप काळजीपूर्वक निवड करते. अवघे काहीच दिवस एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यासाठी बाकी आहेत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पंचांच्या पॅनलमध्ये भारताचा एकही पंच नाही. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमधील पंचांसाठी आयसीसीने एक रक्कम ठरवली आहे. तसेच त्यांचे काम आणि कौशल्य पाहूनच त्यांना मानधन दिले जाते.

आलीम डार – जगातील सर्वात उत्कृष्ट पंच म्हणून पाकिस्तानसाठी 17 प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे आलीम डार यांना ओळखले जाते. वयाच्या 31 व्या वर्षात डार यांनी पंच म्हणून करिअरला सुरुवात केली. पंच म्हणून सुरुवात डार यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केली. 2003, 2007 आणि 2011 च्या विश्वचषक स्पर्धेसह इतरही मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी पंच म्हणून काम केले आहे. आलीम डार पाकिस्तानमधील पहिले पंच आहेत, ज्यांना अॅमिरेट्स अॅलीट पंचाच्या पॅनलमध्ये ठेवण्यात आले आहे. 2009 आणि 2010 असे सलग दोन वर्ष डार यांना ‘अंपायर ऑफ द ईअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांचे एका सामन्याचे मानधन दीड लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच आयसीसीकडून त्यांना वर्षाला 31 लाख 63 हजार एवढे वेतन मिळते.

नाईलेज लॉन्ग – नाईलेज लॉन्ग हे जगातील सर्वात उत्कृष्ट आणि महागडा पंच म्हणून दुसऱ्या क्रमांकावर येतात. नाईलेज लॉन्ग यांना कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये, टी-20 सामन्यासाठी 70 हजार 291 रुपये आणि एकदिवसीय आतंरराष्ट्रीय सामन्यासाठी 1 लाख 54 हजार 641 रुपये त्यांना मिळतात. त्याचबरोबर त्यांना वर्षाला 31 लाख 63 हजार 117 रुपये वेतन मिळते. सुरुवातीला लॉन्ग हे डाव्या हाताने फलंदाजी करायचे आणि ऑफ स्पिन गोलंदाज होते. 2002 मध्ये त्यांनी पंच म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली.

पॉल रिफेल – 1999 मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया टीमचे पॉल रिफेल सदस्य होते. 2004-05 मध्ये त्यांनी पंच म्हणून कामाला सुरुवात केली. क्रिकेट ऑस्ट्रेलिया नॅशनल पंचाच्या पॅनलमध्ये रिफेल यांचा 2005-06 मध्ये समावेश करण्यात आला. यानंतर फेब्रुवारी 2009 मध्ये त्यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम केले होते. रिफेल यांनी आयसीसीकडून कसोटी सामन्यांसाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये , टी-20 सामन्यासाठी 70 हजार रुपये 291 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 1 लाख 54 हजार 641 रुपये मिळतात. त्याचबरोबर आयसीसी त्यांना वर्षाला 31 लाख 63 हजार 117 रुपये पगार मिळतो.

क्रिस गफाने – जगातील सर्वाधिक पंच म्हणून आजही क्रिस गफाने यांचे नाव यांचे नाव घेतले जाते. त्यांनी एक क्रिकेटर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 83 सामने खेळले. यानंतर त्यांनी 113 लिस्ट ए आणि ओटागोसाठी 8 टी 20 सामनेही ते खेळले आहेत. यानंतर त्यांनी 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय पंच म्हणून कामाला सुरुवात केली. क्रिस यांना कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये. टी-20 सामन्यासाठी त्यांना 70 हजार 291 रुपये दिले आणि एकदिवसीय सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 मिळतात. त्याचबरोबर आयसीसी त्यांना वार्षिक 31 लाख 63 हजार 117 रुपये पगार देते.

इयान गूल्ड – इयान गूल्ड हे इंग्लंडचे माजी क्रिकेटर आणि उत्कृष्ट पंच म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 1983 मध्ये विकेटकीपर म्हणून एक सामना खेळला होता. फुटबॉलही गूल्ड यांना खेळायला आवडते. त्यांनी स्लू टाऊन आणि आर्सेनलसाठी गोलकिपर म्हणून खेळ खेळला आहे. गूल्ड यांना कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये तर टी-20 सामन्यासाठी 70 हजार 291 रुपये दिले आणि एकदिवसीय सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 मिळतात. त्याचबरोबर त्यांना आयसीसी वर्षाला 24 लाख 60 हजार 202 रुपये पगार देते.

कुमार धर्मसेना – 2009 मध्ये श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आणि आयसीसीच्या अॅलिट पॅनलमध्ये कुमार धर्मसेनाने पंच म्हणून काम करायला सुरुवातकेली. धर्मसेनाने फक्त पंच म्हणून नाही तर सर्वात श्रीमंत पंच म्हणून त्यांची ओळख आहे. आयसीसीकडून त्याला वर्षाला 24 लाख 60 हजार रुपये पगार मिळतो. याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये. टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये दिले आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 मिळतात.

रिचर्ड इलिंगवर्थ – 2006 मध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वोस्टरशायर, डर्बीशायर आणि नेटालसाठी देशातंर्गत क्रिकेट खेळणाऱ्या रिचर्ड इलिंगवर्थचा पंचाच्या यादीत समावेश केला. यानंतर त्यांना 2009 मध्ये प्रमोशन मिळाले आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये समावेश करण्यात आला. रिचर्ड यांनाही आयसीसीकडून वार्षिक 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये. टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये दिले आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 मिळतात.

रिचर्ड केटलबरो – यॉर्कशायर आणि मिडलसेक्ससाठी रिचर्ड केटलबरो यांनी 33 क्रिकेट सामने खेळले आहेत. त्यांनी 7 अर्धशतक आणि 1 शतकही केले आहे. पण आपला हा डाव ते पुढे घेऊन जाऊ शकले नाही आणि पुढे त्यांनी पंच म्हणून काम केले. 2006 मध्ये इंग्लंड क्रिकेट क्लबने त्यांचा पंचांच्या यादीत समावेश केला. रिचर्ड यांनाही आयसीसीकडून वार्षिक 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये. टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये दिले आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 मिळतात.

ब्रुस ऑक्सेनफोर्ड – जगातील सर्वात श्रीमंत पंचाच्या यादीत ब्रुस ऑक्सेनफोर्डही मोडतात. 1991-1993 पर्यंत ब्रुस यांनी 8 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. यानंतर त्यांनी 2001 मध्ये पंच म्हणून कामाला सुरुवात केली. आयसीसीकडून ब्रुस यांनाही वार्षिक 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये. टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये दिले आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 मिळतात.

रॉड टकर – जगातील प्रसिद्ध पंचापैकी रॉड टकर एक आहेत. टकर न्यू साऊथ वेल्स आणि तस्मानियासाठी देशातंर्गत क्रिकेटमध्येही खेळले आहेत. 2009 मध्ये ऑस्ट्रेलियामधील टी 20 आणि वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रॉड टकर यांनी पंच म्हणून पहिल्यांदा काम केले आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2009 आणि 2010 सोबत आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2011 मध्येही त्यांना उत्कृष्ट पंच म्हणून सन्मानित केले आहे. आयसीसीकडून टकर यांनाही वार्षिक 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये. टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये दिले आणि एकदिवसीय सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 मिळतात.

मराईस ईरास्मस – जगातील सर्वात उत्कृष्ट पंच म्हणून दक्षिण अफ्रिकी पंच म्हणून मराईस ईरास्मस यांना ओळखले जाते. त्यांना 2019 विश्वचषक स्पर्धेमध्ये या कारणामुळे पंच म्हणून निवडले आहे.1988-1996 च्या दरम्यान मारईस ईरास्मस यांनी 53 प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. यानंतर त्यांचा ऑगस्ट 2008 मध्ये आयसीसीच्या अॅलिट पॅनलमध्ये समावेश करण्यात आला. 2010 मध्ये त्यांचे काम पाहून त्यांना प्रमोशन देण्यात आले. आयसीसीकडून मराईस यांनाही वार्षिक 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये. टी-20 सामन्यामध्ये 70 हजार 291 रुपये दिले आणि एकदिवसीय सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 मिळतात.

सुंदरम रवी – एकमेव भारतीय पंच सुंदरम रवी यांचा क्रिकेट वर्ल्ड कप 2019 च्या 12 अॅलिट पंचांमध्ये समावेश करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2011 मध्ये सुंदरम रवी यांनी भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. सुंदरम हे आयसीसीच्या अॅलिट पॅनलमध्ये समावेश करण्यात आलेले एस. व्यंकटराघवन नंतर दुसरे भारतीय आहेत. सुंदरम रवी यांनाही आयसीसीकडून वार्षिक 24 लाख 60 हजार रुपये वेतन मिळते. याशिवाय कसोटी सामन्यासाठी 2 लाख 10 हजार 874 रुपये तर टी-20 सामन्यासाठी 70 हजार 291 रुपये आणि एकदिवसीय सामन्यासाठी त्यांना 1 लाख 54 हजार 641 मिळतात.

Leave a Comment