तुम्ही केलेल्या ऑनलाइन खरेदीवर गुगलची नजर


नवी दिल्ली – तुम्ही केलेल्या ऑनलाइन खरेदीवर गूगल कंपनी नजर ठेवते. कंपनी तुमच्या खरेदीवर तुमच्या खासगी जीमेल अकाउंटवर पाठविण्यात आलेल्या खरेदी पावतीच्या माध्यमातून नजर ठेवते. सीएनबीसीत प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, युझर्सच्या एका खासगी वेब टूलद्वारे ही माहिती उपलब्ध आहे. तुमचा डेटा हे वेब टूल गोपनीय ठेवत असल्याचा दावा कंपनी करते.

व्यक्तिगत जाहीरातीसाठी या माहितीचा वापर करत नसल्याचे गूगलने सांगितले. गूगलने 2017 मध्ये व्यक्तिगत जाहीरातींमध्ये जीमेलच्या एकत्रित झालेल्या डेटाचा वापर बंद करणार असल्याचे सांगितले होते. द वर्जमधील एका विधानात गूगलने म्हटले की, एकाच ठिकाणावर तुम्ही केलेली खरेदी, बुकिंग किंवा सब्सक्रिप्शनवर नजर ठेवण्यासाठी तुम्हाला आम्ही एक व्यक्तिगत केंद्र बनवले आहे. तुमची माहिती तुम्ही त्याठिकाणी सहजरित्या पाहू शकता.

कंपनीने पुढे सांगितले की, ही माहिती तुम्ही कधीही डिलीट करू शकता. तुम्हाला जाहीरात देण्यासाठी आम्ही तुमच्या जीमेल अकाउंटवर ईमेल पावती आणि पर्चेज पेजवर कनफर्मेशन मेसेजसह इतर कुठल्याही माहितीचा करत नाहीत. पण हे टूल किती दिवसांपासून अॅक्टीव्ह आहे याबाबत सांगितले नाही.

Leave a Comment